Sharad Pawar : शिवतीर्थवरील राज ठाकरे अन् दादा भुसे यांच्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, माझ्या ज्ञानात भर पडली

Sharad Pawar : शिवतीर्थवरील राज ठाकरे अन् दादा भुसे यांच्या बैठकीवर शरद पवार म्हणाले, माझ्या ज्ञानात भर पडली

| Updated on: Oct 13, 2023 | 5:28 PM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे यांच्या शिवतीर्थवरील बैठकीवर शरद पवार यांची खोचक टीका, माझ्या ज्ञानात एवढीच भर पडली की मंत्री कुणाच्या घरी जाऊन त्याच्याकडून निर्णय घेतो. ही एक नवीन पद्धत सुरू झाली आहे, असे पवार म्हटले

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदे सरकारचे मंत्री दादा भुसे यांच्या शिवतीर्थवरील बैठकीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी खोचक टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या घरी जाऊन टोलसंदर्भात निर्णय घेणे ही नवीन पद्धत आहे, असे म्हणत शरद पवार यांनी राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात झालेल्या बैठकीवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः दादा भुसे हे उपस्थित होते. यांच्यात सव्वा दोन तास चर्चा झाली आणि याच बैठकीत तब्बल १६ निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार म्हणाले, मला काही माहिती नाही. काय झालं ते. माझ्या ज्ञानात एवढीच भर पडली की मंत्री कुणाच्या घरी जाऊन त्याच्याकडून निर्णय घेतो. ही एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. चांगली गोष्ट आहे.

Published on: Oct 13, 2023 05:27 PM