Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात सत्तेची हवा अन् मुस्लिमांबाबत..', शरद पवारांचा नाव न घेता कोणावर निशाणा?

‘माजी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलांच्या डोक्यात सत्तेची हवा अन् मुस्लिमांबाबत..’, शरद पवारांचा नाव न घेता कोणावर निशाणा?

| Updated on: Sep 23, 2024 | 4:14 PM

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर रत्नागिरीतील चिपळूणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली. 18 वर्षांनंतर शरद पवारांची चिपळूणमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी नारायण राणे यांच्या मुलांवर निशाणा साधला आहे.

मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शरद पवार पहिल्यांच कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीतील सभेतून त्यांनी सरकारसह नारायण राणे यांच्या मुलांवर जोरदार टीकास्त्र डागलं. धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला, त्याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं यावर बोलताना शरद पवारांनी त्यांचा समाचार घेतला. ‘राज्यातील एका केंद्रीय मंत्र्यांची मुलं मुस्लिम समाजाच्या संबंधी या पद्धतीने जाहीर वाक्य करतात त्यांना आवर घातलं जात नाही. उलट टेलिव्हिजनवर त्यांनी बोलावं याची काळजी घेतली जाते याचा अर्थ सत्ता डोक्यात गेली आहे. जेव्हा सत्ता डोक्यात जाते तेव्हा लोक एक होतात आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहत नाही’, असे शरद पवार म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला. त्यांनी माझ्यासोबत काम केलंय. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ली बोलतात, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा, ही कशा प्रकराची भाषा आहे. समाजात सर्व जाती धर्माचे लोक आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं.

Published on: Sep 23, 2024 04:14 PM