महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला धक्का,  शरद पवार यांच्या संघटनेची मान्यता रद्द

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला धक्का, शरद पवार यांच्या संघटनेची मान्यता रद्द

| Updated on: Apr 18, 2023 | 7:47 AM

VIDEO | कित्येक वर्ष अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांना धक्का, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द

मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या परिषदेला मोठा धक्का बसल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांच्या संघटनेची संलग्नता असलेल्या भारतीय कुस्तीगीर महासंघ महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे अनेक वर्ष अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांना कुस्ती क्षेत्रात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. उत्तर प्रदेश मधील लखनऊ येथे भारतीय कुस्तीगीर महासंघाची सर्वसाधारण सभा पार पडली या सभेपूर्वी महासंघाच्या कार्यकारणीची बैठक झाली या बैठकीमध्ये शरद पवारांच्या कुस्तीगीर परिषदेला पाठवलेल्या नोटीसीवर चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा यावर चर्चा करून शरद पवार यांच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आली आहे.

Published on: Apr 18, 2023 07:40 AM