‘डर्टी डझन’चा शेकहँड, अमित शाह अन् हसन मुश्रीफ यांच्या भेटीवरून सुप्रिया सुळेंचा निशाणा
अमित शाह आणि हसन मुश्रीम यांच्या कोल्हापुरातील भेटीवरून सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. 'डर्टी डझन' म्हणून ज्यांच्यावर आरोप केले त्यातील एकाने अमित शाहांची भेट घेतली, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
कोल्हापूर विमानतळावरील अमित शाह आणि हसन मुश्रीम यांच्या भेटीवरून सुप्रिया सुळे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन निशाणा साधला. ‘डर्टी डझन’ म्हणणाऱ्या नेत्यांना अमित शाह यांनी शेक हँड कसा केला? फाईल क्लिअर झाली असेल तर हसन मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप केले हे अमित शाह यांनी सांगावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कोल्हापूर विमानतळावर अजित पवार यांचे मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेक हँडही केलं. मात्र यावरूनच सुप्रिया सुळे यांनी डर्टी डझनची आठवण करून दिली. महाविकास आघाडी सरकार असताना डर्टी डझन म्हणत भाजपच्या किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. यामध्ये अनिल परब, संजय राऊत, सुजीत पाटकर, भावना गवळी, अनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर , जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, नवाब मलिक यांची नावं ट्वीट करत घोटाळेबाजांना हिशोब तर द्यावा लागेल, असं म्हटलं होतं.. बघा यासंदर्भातील स्पेशळ रिपोर्ट