Supriya Sule | MIM बाबतचा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेईल

| Updated on: Mar 19, 2022 | 10:04 PM

एमआयएम (MIM) समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे, असे विधान जयंत पाटील यांनी केलं आहे.

बारामती : एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्या एकत्र येण्याच्या विधानावर राज्यात सध्या वेगवान प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरून पुन्हा भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचाच (Devendra Fadanvis) हा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पाडण्याचे सर्व प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता काय करायचे म्हणून फडणवीसांनी हा बी प्लॅन आखला आहे, असे ते म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मात्र याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एमआयएम (MIM) समविचारी पक्ष आहे का याचा अभ्यास करावा लागेल. एमआयएम समविचारी आहे असं म्हणायचं असेल तर त्यांनी भाजपला असलेला त्यांचा विरोध कृतीत दाखवला पाहिजे, असे विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. तर खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र याबाबत वेगळी प्रतिक्रिया दिली आहे.