अन् सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, पुण्यातील कार्यक्रमात एकच खळबळ
पुण्यातील एका कार्यक्रमात पूजा करत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला. सुप्रिया सुळे यांनी स्वत: प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पुण्यातील एका कार्यक्रमात पूजा करत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने हा प्रकार सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीच तातडीने आग विझवली. सुप्रिया सुळे यांनी स्वत: प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला होता. या कार्यक्रमाचं सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सुप्रिया सुळे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यावेळी मूर्तीसमोरच समई पेटवलेली होती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत असताना त्यांच्या साडीचा पदर खाली आल्याने साडीने पेट घेतला मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही.