'नितेश राणे अन् पडळकर हे एकाच माळेचे मणी', राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला, नेमकी कुणावर केली सडकून टीका?

‘नितेश राणे अन् पडळकर हे एकाच माळेचे मणी’, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला, नेमकी कुणावर केली सडकून टीका?

| Updated on: Sep 20, 2023 | 5:09 PM

VIDEO | गोपीचंद पडळकर यांच्या 'त्या' वक्तव्यानं वाद, अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक, नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांना कुणी दिलं प्रत्युत्तर?

मुंबई, २० सप्टेंबर २०२३ | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी आज ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर हे एकाच माळेचे मणी आहेत. तसेच आम्ही कधी पातळी सोडून टीका करत नाही. नारायण राणे यांना एमएसईबी लघु सूक्ष्म मंत्रालयामध्ये स्वतःचा ठसा उमटता आला नाही’, अशी टीका ही संविधानिक असल्याचे त्यांनी म्हटले. तर नारायण राणे हे कोंबडी चोर आहेत असं म्हणणं हे वैयक्तिक टीकेचं लक्षण असल्याचे म्हणत नितेश राणेंना सूरज चव्हाण यांनी लक्ष्य केले आहे.

Published on: Sep 20, 2023 04:25 PM