Ladki Bahin Yojana : 'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...', काँग्रेस नेत्याचा सवाल

Ladki Bahin Yojana : ‘महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता…’, काँग्रेस नेत्याचा सवाल

| Updated on: Dec 19, 2024 | 11:51 AM

लडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यातून दिले होते. दरम्यान ही योजना विधानसभा निवडणुकीच्या निकाला गेमचेंजर ठरताना दिसली. मात्र राज्याच्या पहिल्याच अधिवेशनात राज्यपाल यांच्या अभिभाषणात लाडक्या बहिणी योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचा उल्लेख का नाही? असा सवाल काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. राज्यातील […]

लडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यामध्ये २१०० रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यातून दिले होते. दरम्यान ही योजना विधानसभा निवडणुकीच्या निकाला गेमचेंजर ठरताना दिसली. मात्र राज्याच्या पहिल्याच अधिवेशनात राज्यपाल यांच्या अभिभाषणात लाडक्या बहिणी योजनेत महिलांना २१०० रुपये देण्याचा उल्लेख का नाही? असा सवाल काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना २१०० रूपये कधी देणार? याची लाडक्या बहिणी वाट बघत आहेत, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात उल्लेख आहे आता २१०० रूपये द्यावेच लागणार असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. वडेट्टीवार सभागृहात बोलताना असे म्हटले की, ‘महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. त्याकरता ४६ हजार कोटी रूपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. आम्ही त्याचं काही लोकांनी स्वागत केलं. महायुती सरकारने त्या १५०० रूपयांवरून २१०० रूपये देण्याचा निर्णय घेतला. आता तुम्हाला ते द्यावेच लागणार आहे. कारण महायुतीने याचा उल्लेख त्यांच्या जाहीरनाम्यात केला आहे. मग ते आता कधी देणार? १५०० रूपये देणार की २१०० रूपये देणार? राज्यातील लाडक्या बहिणी याची वाट पाहत आहेत’, असे सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून निशाणा साधला आहे.

Published on: Dec 19, 2024 11:51 AM