अमोल कोल्हे यांच्या बाबत कालच घोषणा आणि आज चक्क कोणाची पलटी?; पुण्यात राष्ट्रवादीत नक्की काय सुरू?

अमोल कोल्हे यांच्या बाबत कालच घोषणा आणि आज चक्क कोणाची पलटी?; पुण्यात राष्ट्रवादीत नक्की काय सुरू?

| Updated on: Jun 06, 2023 | 1:55 PM

आधी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी दंड थोपाटले होते. मात्र कालच त्यांनी आपली माघार घेत शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती.

पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात प्रत्येक मतदारसंघात सर्व पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही लोकसभेवरून आढावा घेतला जात आहे. याचदरम्यान असाच आढावा शिरूर लोकसभा मतदारसंघात घेण्यात आला. यावेळी आधी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी दंड थोपाटले होते. मात्र कालच त्यांनी आपली माघार घेत शिरूरमधून अमोल कोल्हेच लोकसभा निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. तोच आता त्यांना पलटी मारत पुन्हा एकदा आपल्या मनातील बोलून दोखवत शिरूरवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी आणि नेत्यांच्यात नक्की काय सुरू आहे असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये पडला आहे. यावेळी विलास लांडे यांनी आपण अजून ही शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितलं आहे. तर शरद पवार यांनी संधी दिली तर काम करायला आवडेल अशी सूचक प्रतिक्रिया टीव्ही 9 ला दिली आहे. तर अमोल कोल्हे यांना कधी विरोध करणार नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 06, 2023 01:55 PM