Chhagan Bhujbal | जसा मला न्याय मिळाला तसा इतरांनाही मिळेल : छगन भुजबळ
कोणावरही लोभ नाही, असंही ते म्हणाले. आमचं सरकार असल्यामुळे माझी सुटका झाली असं नाही तर माझ्या वकिलांनी माझी न्यायालयात तगडी बाजू मांडली. माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. अखेर न्यायदेवतेने निर्णय दिला. माझ्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे, असं भुजबळ म्हणाले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं, असं सांगताना या सगळ्या प्रकरणानंतर आता आमच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही. कोणावरही लोभ नाही, असंही ते म्हणाले. आमचं सरकार असल्यामुळे माझी सुटका झाली असं नाही तर माझ्या वकिलांनी माझी न्यायालयात तगडी बाजू मांडली. माझा न्यायदेवतेवर विश्वास होता. अखेर न्यायदेवतेने निर्णय दिला. माझ्यासाठी हा मोठा दिलासा असणार आहे, असं भुजबळ म्हणाले.
Latest Videos