तर बीड जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलाने फोडतील; निवडून येताच खासदार बजरंग सोनवणे असं का म्हणाले?
शरद पवार गटात आपलं भविष्य उज्ज्वल नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात घेण्यासाठी विनंती केली असेल”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल केला. या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र या दाव्यावर खुद्द बजरंग सोनवणे यांनीच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.
तळागाळातील, सोशितांचे, वंचितांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकच नेता सक्षम आहे, तो नेता म्हणजे अजित पवार. त्यामुळे आज सकाळी बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन आला. तो फोन साखर कारखान्याच्या संदर्भात होता. पण तो फोन असाही असू शकतो की, बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्याकडे आपल्याला पुन्हा आपल्या गटात घ्यावं, अशी विनंती करत असावेत. शरद पवार गटात आपलं भविष्य उज्ज्वल नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटात घेण्यासाठी विनंती केली असेल”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल केला. या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. मात्र या दाव्यावर खुद्द बजरंग सोनवणे यांनीच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. बजरंग सोनवणे म्हणाले, अमोल मिटकरी हे अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कोण आहेत अमोल मिटकरी? असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला. कारण ऑपरेटर कडेच फोनचे रेकॉर्ड असते, असा खोचक टोला त्यांनी लगावला. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने खूप प्रेम केले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलाने फोडेल. पवार साहेबांना सोडायचं म्हंटल्यावर माझे वडील मला कानशिलात मरतील. माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल, अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली.