‘प्रभू रामचंद्राला आदर्श मानत असाल तर…’, अमोल मिटकरी यांचा राज ठाकरे यांना टोला
VIDEO | रामनवमीनिमित्तानं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा, बघा काय केली टीका
अकोला : देशभरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे. रामभक्तांचा हा उत्साह शिगेला पोहोचला आहे. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच रामनवमीनिमित्तानं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर राज ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावरून राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित हिंदू जननायक परदेश दौऱ्यावर पळाले. आता आज त्यांचं हिंदुत्व कुठे गेलं. जसे रामाने आपल्या सावत्र भावाला आयोद्धेची गादी सन्माने दिली तसे तुम्ही प्रभू रामचंद्राला आदर्श मानत असाल तर स्वतःच्या भावाला पक्ष सोपवा, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.