'चापलूसीनं राज्यसभेवर खासदारकी, आता किती चमचेगिरी करणार', अमोल मिटकरी यांचा भाजप नेत्यावर निशाणा

‘चापलूसीनं राज्यसभेवर खासदारकी, आता किती चमचेगिरी करणार’, अमोल मिटकरी यांचा भाजप नेत्यावर निशाणा

| Updated on: Apr 02, 2023 | 5:41 PM

VIDEO | 'अनिल बोंडे व्यक्ती नसून विकृती, बाहेरून जितके विषारी तितकेच...', अमोल मिटकरी यांचा जोरदार घणाघात

मुंबई : भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी संभाजीनगरमधील दोन गटात झालेली हाणामारी हे राष्ट्रवादीचे कटकारस्थान होत, अशी टीका केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मिटकरी म्हणाले, अनिल बोंडे ही व्यक्ती नसून विकृती आहे. अमरावती शहरात या व्यक्तीने दंगली भडकवण्याचं पाप केलं. यावरून ही व्यक्ती किती विकृत असली पाहिजे हे सर्व अमरावतीकरांना माहीत आहे. अनिल बोंडे बाहेरून जितके विषारी आहेत, तितकेच आतूनही विषारी आहेत. त्या व्यक्तीबद्दल बोलणं योग्य वाटत नाही. अनिल बोंडे यांनी आजपर्यंत जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे पाप केले असल्याचे त्यांनी म्हटले तर अनिल बोंडे हे गृहमंत्र्यांचे चमचे आहेत का ते सांगावे. चापलूसी करून तुम्हाला राज्यसभेवर खासदारकी मिळाली. आणखी किती चमचेगिरी करणार आहात. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री पद सांभाळण्यात अपयशी आहेत का, याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Apr 02, 2023 05:37 PM