'लवकरच जनता तुमचा कडेलोट करेल', शिवराज्याभिषेक सोहळादिनी राज्य सरकारला इशारा

‘लवकरच जनता तुमचा कडेलोट करेल’, शिवराज्याभिषेक सोहळादिनी राज्य सरकारला इशारा

| Updated on: Jun 02, 2023 | 2:42 PM

VIDEO | 'तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा सनातनच्या प्रचारासाठी होता का?', राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगडावर मोठ्या दिमाखात महाराजांचा हा सोहळा पार पडला होता. त्या अविस्मरणीय क्षणाला आज तिथीनुसार, ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक बडे राजकीय नेते मंडळीदेखील उपस्थित आहे. रायगडावर मोठ्या उत्साहात महाराजांचा शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा होतोय. दरम्यान, आज तिथीनुसार 350 वा होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करून राज्य सरकारवर हल्लोबोल केला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा सनातन धर्म प्रचारासाठी होता का?’, असा सवाल करत छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं राज्य हे सनातनी नव्हतं. ते रयतेच स्वराज्य होतं! तुम्ही परत परत चूक करताय. तुमचा टकमकीवरून लवकरच जनता कडेलोट करेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

Published on: Jun 02, 2023 02:34 PM