अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना दिल्या थेट भावी मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा!
VIDEO | शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या गुढीपाडव्याच्या सभेवर अमोल मिटकरी यांची राज ठाकरे यांच्यावर टीका, काय म्हणाले बघा...
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्यानिमित्त जाहीर सभा झाली. राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. हा दर्गा अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा, नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा देतानाच राज ठाकरे यांनी प्रशासनाला कारवाईसाठी एक महिन्याची मुदत दिली. त्यांच्या या भाषणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच कारवाई सुरु झाली. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच जिल्हाधिकारी, पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या दर्ग्याची पाहणी करून तिथले अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. यावरच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच तत्परतेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भावी मुख्यमंत्र्यांनी मागणी केली असती तर सरकार घाबरले असते, असे म्हणत मिटकरी यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.