महाराष्ट्रातील घाण गेली अन् आनंद झाला, विरोधी पक्षातील कोणत्या नेत्यांनं केली टीका?

महाराष्ट्रातील घाण गेली अन् आनंद झाला, विरोधी पक्षातील कोणत्या नेत्यांनं केली टीका?

| Updated on: Feb 12, 2023 | 12:38 PM

VIDEO | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी काय म्हणाले, बघा व्हिडीओ

अकोला : निर्लज्ज सदा सुखी अशा पद्धतीने पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्रात अवतरले होते. मविआने त्यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर सरकारला उशीरा आलेले शहानपण आहे. आगामी निवडणुकीच्या अधिवेशनात भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानंतर गदारोळ होणार होता, हे भाजपला माहित होतं. एक बेशरम, निर्लज्ज माणूस आणि महापुरूषांचा अपमान करणारा माणूस महाराष्ट्रातून गेला याचा आम्हाला आनंद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या माध्यमातून झारखंडचे राज्यपाल महाराष्ट्रात आले आहे. ते भगतसिंह कोश्यारी यांच्यासारखे वागणार नाही, राज्याचे ते आदर करतील, कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्राची घाण गेली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Published on: Feb 12, 2023 12:38 PM