भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही : अमोल मिटकरी

भाजपची कोणतीही लाट किंवा वादळ नाही : अमोल मिटकरी

| Updated on: Mar 11, 2022 | 2:09 PM

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर (Election Result 2022) अनेक वृत्तवाहिन्या मोदी लाट कायम असल्याचं दाखवत आहेत.

मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर (Election Result 2022) अनेक वृत्तवाहिन्या मोदी लाट कायम असल्याचं दाखवत आहेत. परंतु पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांची माहिती घेतली तर भाजपची (BJP) परिस्थिती वाईट आहे, असा दावा राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. 29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे, तर तीन राज्यांमध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही.