टुकार गल्लीतला बेवडा, फक्त शर्टाला हात लाव; तिरपी मान... अमोल मिटकरीचं मनसे नेत्याला ओपन चॅलेंज

टुकार गल्लीतला बेवडा, फक्त शर्टाला हात लाव; तिरपी मान… अमोल मिटकरीचं मनसे नेत्याला ओपन चॅलेंज

| Updated on: Aug 02, 2024 | 1:08 PM

दिसला की पुन्हा कुत्र्यासारखं तुडवणार... राज ठाकरेंना सुपारी बहाद्दर म्हटल्याने मनसेचे सरचिटणीस कर्नबाळा दुनबाळे यांनी अमोल मिटकरींना पुन्हा इशारा दिला होता. यानंतर आणखी एका मनसे नेत्यानं मिटकरींवर निशाणा साधलाय. घासलेट चोरपासून ते कपडे काढून मारूपर्यंत मनसे नेत्यांनं टीका केली आहे.

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेल्या एका वक्तव्यानंतर चांगलाच वाद झालेला आहे. हा वाद थेट अमोल मिटकरींची गाडी फोडण्यापर्यंत पोहोचला. इतकंच नाहीतर आता मनसेचे विविध नेते अमोल मिटकरीवर तोंडसूख घेत असल्याचे राहायला मिळत आहे. यापुढे राज ठाकरे यांच्यावर बोलाल तर कपडे काढून मारू, असा इशारा पुन्हा एकदा मनसेकडून अमोल मिटकरी यांना देण्यात आला आहे. तर अमोल मिटकरीची लायकी काय तो घासलेट चोर म्हणत अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली. अमेय खोपकर यांच्या टीकेनंतर अमोल मिटकरी यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. टुकार गल्लीतला बेवडा, माझे कपडे काढण्याची भाषा करतो, फक्त शर्टाला हात लाव तिरपी झालेली मान सरळ होईल, असे म्हणत जिव्हारी लागणारा पलटवार मिटकरींनी मनसे नेत्यावर केला आहे.

Published on: Aug 02, 2024 01:08 PM