अमोल मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? 'भावी अनेक पण प्रभावी एकच...', बॅनरबाजीनं चर्चांना उधाण

अमोल मिटकरी ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार? ‘भावी अनेक पण प्रभावी एकच…’, बॅनरबाजीनं चर्चांना उधाण

| Updated on: Oct 09, 2024 | 4:23 PM

अकोला जिल्ह्यातून अद्याप अमोल मिटकरी यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र अकोटमध्ये त्यांची चांगलीच चर्चा होते. अकोला जिल्ह्यात अकोट, बाळापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मुर्तिजापूर असे मतदारसंघ आहे. त्यापैकी कोणत्या मतदारसंघातून मिटकरी निवडणूक लढवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी अकोल्या जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या अकोला जिल्ह्यात सुरू असल्याची पाहायला मिळत आहे. अकोट मतदारसंघातील अकोट, तेल्हारा आणि हिवरखेड शहरात आमदार अमोल मिटकरी यांच्या उमेदवारीचे बॅनर्स लागले आहेत. दरम्यान, अकोट मतदारसंघात गेल्या दोन टर्म्सपासून भाजपचे प्रकाश भारसाकळे हे आमदार म्हणून राहिले आहेत. अशातच अमोल मिटकरी अकोट तालूक्यातील कुटासा गावाचे असून अमोल मिटकरी हे अकोट मतदारसंघात चांगलेच सक्रीय झाले आहेत. याआधी या अकोट मतदारसंघावर एकनाथ शिंदे गट शिवसेनेकडूनही दावा करण्यात आला होता. तर काल आणि आजही अमोल मिटकरी यांचे अकोट मतदारसंघात मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वर्षभरापासून अमोल मिटकरी यांनी मोठ्या प्रमाणात केला आमदारनिधी खर्च केला असून भावी अनेक आणि प्रभावी एकच असे बॅनर्स आमदार अमोल मिटकरीचे अकोट मतदारसंघात झळकल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Oct 09, 2024 04:23 PM