Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवजयंतीला शिंदेंनी  स्वत:चं ब्रॅडिंग केलं, एवढी बॅनरबाजी कधीही पाहिली नव्हती; राष्ट्रवादीच्या आमदाराचा घणाघात

शिवजयंतीला शिंदेंनी स्वत:चं ब्रॅडिंग केलं, एवढी बॅनरबाजी कधीही पाहिली नव्हती; राष्ट्रवादीच्या आमदाराचा घणाघात

| Updated on: Feb 19, 2023 | 10:37 AM

राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून अतुल बेनके यांनी निशाणा साधलाय. पाहा...

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023 : राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर उपस्थिती दर्शवली. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून अतुल बेनके यांनी निशाणा साधलाय. मी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत नाराजी व्यक्त करणार आहे. आतापर्यंत शिवजयंतीला एवढे बॅनर कधीही पाहायला मिळाले नव्हते. ते यंदा पाहायला मिळाले, असं बेनके म्हणाले. खासदार अमोल कोल्हेंच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. भगवा ध्वज शिवनेरीवर कायमस्वरूपी असलाच पाहिजे. राज्यकर्त्यांना याची जाणीव व्हावी, यासाठी अमोल कोल्हे आंदोलन करत आहेत. त्यांना माझा पाठिंबा आहे, असं बेनके म्हणालेत.

Published on: Feb 19, 2023 10:30 AM