‘Devendra Fadnavis यांना भीती, म्हणून माफी मागितली’, एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
VIDEO | 'जालन्यातील घटना घडल्यावर लगेच माफी मागितली असती तर महाराष्ट्र पेटला नसता, माफी मागायची सवय देवेंद्र फडणवीस यांना करावी लागेल', एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा
जालना, ५ सप्टेंबर २०२३ | जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सलग आठव्या दिवशी उपोषण सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारने सरकारने अध्यादेश घेऊन यावं, नाहीतर आजपासून पाण्याचा त्याग करणार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणावर शासनाची भूमिका स्पष्ट केली असून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचं आश्वासन दिलं. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल घडलेल्या घटनेवर लगेच माफी मागितली असती तर महाराष्ट्र पेटला नसता, माफी मागायची सवय देवेंद्र फडणवीस यांना करावी लागेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. ते असेही म्हणाले, धनगर समाज असेल किंवा इतर समाजाच्या आरक्षणाबद्दलही फडणवीस यांनी शब्द दिला होता. मात्र तो पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे फडणवीस यांना अशा पद्धतीने माफी मागण्याची वेळ गृहमंत्री पदावर असताना आज आली आहे.