‘हो, मी स्वगृही जाणार’, भाजपवरील नाराजी संपली? एकनाथ खडसे काय म्हणाले?
'भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये मी पक्षप्रवेश करणार आहे. केंद्रीय नेतृत्वात मी हा पक्षप्रवेश करणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीमध्ये माझं योगदान राहिलं आहे. गेली काही अनेक वर्ष मी या घरामध्ये राहिलो आहे.', भाजपात प्रवेश करण्याबद्दल खडसे यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आता पुन्हा स्वगृही भाजपात प्रवेश करणार आहेत. याबद्दल त्यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये मी पक्षप्रवेश करणार आहे. केंद्रीय नेतृत्वात मी हा पक्षप्रवेश करणार आहे. पुढे एकनाथ खडसे असेही म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या जडणघडणीमध्ये माझं योगदान राहिलं आहे. गेली काही अनेक वर्ष मी या घरामध्ये राहिलो आहे. चाळीस वर्षांहून अधिक वर्ष ज्या भाजपमध्ये मी राहिलो त्यामुळे माझा लगाव जाण्याचा होता. तर काही कारणासाठी माझी नाराजी झाली त्यामुळे मी या पक्षातून बाहेर पडलो होतो. माझ्या नाराजीची तीव्रता कमी झाली म्हणून मी माझ्या पक्षात जातोय, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. माझ्या पक्षप्रवेशाने कोणाचीही नाराजी नाही मी सर्वांना घेऊन चालणारा आहे. माझ्याविषयी कोणाची नाराजी असेल तर मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेल, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले.