Eknath Khadse : मंत्री असताना दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, एकनाथ खडसे यांचा कुणावर निशाणा?
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा शाब्दिक हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मेळाव्यात बोलत असताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता लक्ष्य केले
जळगाव, १ डिसेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा शाब्दिक हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मेळाव्यात बोलत असताना एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असताना कोणते धरण पूर्ण केलं? असा सवाल करत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ खडसे म्हणाले, जे धरण दिसत आहेत ते काम नाथाभाऊने पूर्ण केलं. दहा वर्ष झाले मंत्री आहेत, पण पाडळसरे धरणाचं काम करण्यासाठी एक दमडीही दिली नाही. मंत्री असताना दमडी दिली नाही,त्यांना बुटाने मारले पाहिजे, असा शब्दात प्रत्यक्ष नाव न घेता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.

एक खोक्याभाई काय घेऊन बसले.. , राज ठाकरेंची सरकारवर सडेतोड टीका

मराठवाड्यात पाणी टंचाईचं सावट; लवकरच करावा लागणार पाणीबाणीचा सामना

मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
