Hasan Mushrif : ईडी प्रकरणात हसन मुश्रीफ यांना दिलासा; 27 एप्रिलपर्यंत संरक्षण कायम

Hasan Mushrif : ईडी प्रकरणात हसन मुश्रीफ यांना दिलासा; 27 एप्रिलपर्यंत संरक्षण कायम

| Updated on: Apr 13, 2023 | 12:33 PM

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत झटका दिला होता. त्यानंतर आज उच्च न्यायालयाने त्यांचे संरक्षण कायम ठेवल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणी काहीअंशी कमी होताना दिसत आहे. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देताना, अटकेपासून संरक्षण दिलं आहे. हे संरक्षण 27 एप्रिलपर्यंत कायम असेल. तर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार देत झटका दिला होता. त्यानंतर आज उच्च न्यायालयाने त्यांचे संरक्षण कायम ठेवल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या तीन मुलांची सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना आणि अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्जपुरवठा प्रकरणात चौकशी सुरु आहे. ईडीकडून मुश्रीफांविरोधात 35 कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तीनवेळा ईडीकडून छापेमारी झाली आहे. साजिद, आबिद आणि नावेद यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 20 एप्रिलला होणार आहे. पुढील सुनावणीपर्यंत कठोर कारवाई न करण्याचे तपास यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत.

Published on: Apr 13, 2023 12:33 PM