शिवसेनेच्या जाहिरातींवर दोन दिवसांत किती कोटी खर्च? राष्ट्रवादीच्या नेत्यानं थेट आकडाच सांगितला
VIDEO | 'शिवसेनेची आजची जाहिरात म्हणजे सरड्यासारखी...', कुणी लगावला खोचक टोला
मुंबई : सलग दोन दिवसांपासून प्रसिद्ध होत असलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया येताना दिसताय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या जाहिरातीवरून एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. शिंदे यांची आजची जाहिरात म्हणजे सरड्यासारखी आहे. हे सगळं सरड्याच्या रंगासारखं आहे. त्यांना काही वाटत नाही. संपूर्ण महाराष्ट्र पहिल्या पानावरची जाहिरात वाचतो. आज एक जाहिरात उद्या एक जाहिरात येते म्हणजे त्यांची पॉलिटिकल क्रेडिबिलिटी शून्य झालीच आहे. परंतु बौद्धिक क्रेडिबिलिटी पण आज शून्य झाल्याचे आव्हाड म्हणाले. तर त्यांनी या जाहिरातीचा थेट आकडाच सांगितला आहे. जाहिरातींवर दोन दिवसांत 10 कोटींची खर्च झाला आहे. एवढे पैसे आणतात कुठून? ज्यांनी बोटाला धरुन त्यांना या पदावर बसवलं, त्यांची ही अवेहलना आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांना सांभाळून घेतात. त्यांना अशी वागणूक देणार असाल तर ठेच पोहोचते. काहीही म्हटलं तरी फडणवीस मोठे नेते आहेत, असं सांगतानाच 40 आमदारांचं काय प्रेशर आहे, हे मंत्रालयातील सचिवांना विचारा. ते कुणाच्या बदल्या मागतात हे पाहा, असंही ते म्हणाले.