‘मला माफ करा, मी अस्वस्थ आहे’, असे ट्वीट करत जितेंद्र आव्हाड वाढदिवसाच्या दिवशी अज्ञातस्थळी अन् फोनही बंद
VIDEO | पहिल्यांदाच जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णयाने समर्थकांमध्ये चलबिचल सुरू, ट्वीटचा रोख नेमका कुणावर?
ठाणे, ५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात मोठी बॅनरबाजी केल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षी जितेंद्र आव्हाड आपला वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतात. मात्र यंदा पहिल्यांदाच ते आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत असे म्हटले की, ‘माफ करा, मी अस्वस्थ आहे. मी कुणालाही भेटू इच्छित नाही, देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला स्त्रियांवरील अत्याचार, महाराष्ट्रामध्ये वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. हे सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला अजिबात वाटत नाही.’