जसा पाण्याविना मासा, तशी सत्तेविना भाजपाची आवस्था; निलेश लंकेंचा भाजपाला टोला

जसा पाण्याविना मासा, तशी सत्तेविना भाजपाची आवस्था; निलेश लंकेंचा भाजपाला टोला

| Updated on: Feb 20, 2022 | 8:08 PM

राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दोनच गोष्टी असतात एक म्हणजे यश आणि दुसरे अपयश. अपयश आल्यानंतर आपण कुठे कमी पडलो? जनतेने का नाकारले याचा विचार करायचा असतो. मात्र भाजप फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात व्यस्त असल्याची टीका आमदार निलेश लंके यांनी केली आहे.

राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. दोनच गोष्टी असतात एक म्हणजे यश आणि दुसरे अपयश. अपयश आल्यानंतर आपण कुठे कमी पडलो? जनतेने का नाकारले याचा विचार करायचा असतो. मात्र भाजप फक्त सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात व्यस्त आहे. जशी पाण्याविना माशाची आवस्था होते, तशीच भाजपाची सत्ता नसताना होते, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भाजपाला लगावला आहे.