भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नव्हे तर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखंच वागायचे; कुणाचा निशाणा? पाहा...

भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नव्हे तर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखंच वागायचे; कुणाचा निशाणा? पाहा…

| Updated on: Feb 12, 2023 | 12:49 PM

भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय म्हटलंय? पाहा...

अहमदनगर : भगतसिंग कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा आज राजीनामा मंजूर झाला. हे सगळं याआधीच व्हायला पाहिजे होतं.कोश्यारी राज्यपाल नव्हे तर भाजपचे प्रवक्ते असल्यासारखंच वागत होते. महाराष्ट्रात येऊन राज्याच्या अस्मितेला धक्का पोहोचण्याचं काम त्यांनी केलं. राष्ट्रपुरुषांचा अवमान केला. म्हणूनच त्यांना वाचाळवीर म्हणून संबोधलं जायचं. राज्यपालपदाचा राजीनामा द्यायला उशीर झाला. पण त्यांचा राजीनामा घेण्यात आला. याचं आम्हाला समाधान आहे, असं निलेश लंके म्हणालेत.

Published on: Feb 12, 2023 12:49 PM