बबनराव लोणीकर यांच्याकडून राजेश टोपे यांना शिवीगाळ, ऑडिओ क्लीप व्हायरल; काय आहे प्रकरण?

बबनराव लोणीकर यांच्याकडून राजेश टोपे यांना शिवीगाळ, ऑडिओ क्लीप व्हायरल; काय आहे प्रकरण?

| Updated on: Dec 14, 2023 | 2:51 PM

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून राष्ट्रवादी आमदार राजेश टोपे यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपची tv9 पुष्टी करत नाही.

जालना, १४ डिसेंबर २०२३ : भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडून राष्ट्रवादी आमदार राजेश टोपे यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडीवरून बबनराव लोणीकर यांनी ही शिवीगाळ केल्याचे सांगितले जात आहे. जालना जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी जिल्हा बँकेवर अध्यक्षपदी राजेश टोपे यांचे बंधु सतीश टोपे तर, उपाध्यक्षपदी राहुल लोणीकर ऐवजी, भाजपा खासदार, मंत्री रावसाहेब दानवे यांचे समर्थक भीमराव जावळे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर बबनराव लोणीकर यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि त्याच दिवशी बबनराव लोणीकर यांच्या घरावरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक झाली. राजेश टोपे यांनी बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहूल लोणीकर यांना जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष न करता भीमराव जावळे यांची जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. याचा राग लोणीकरांच्या मनात होता. या रागातून लोणीकरांनी राजेश टोपे यांना शिवीगाळ केली. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून या क्लिपची tv9 पुष्टी करत नाही.

Published on: Dec 14, 2023 02:51 PM