अजितदादांचे ‘इतके’ आमदार आमच्या संपर्कात, रोहित पवारांच्या मोठ्या दाव्यानं खळबळ
अजित पवार गटातील आमदार घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे काही दावे केले जात आहेत. अशातच शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवारांच्या गटातील १८ ते १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असं दावा रोहित पवार यांनी केला आहे.
नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालात भाजप आणि महायुतीची चांगलीच दाणादाण इडाली. तर राज्यात मविआने ३० आणि महायुतीने १७ जागांवर विजय मिळवला. अजित पवार गटातील आमदार घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचे काही दावे केले जात आहेत. अशातच शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवारांच्या गटातील १८ ते १९ आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असं दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार म्हणाले, अजित पवारांचे १९ आमदार शरद पवाराच्या संपर्कात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तर त्यांच्या गटातील इतर १२ आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत. ते काय करतील ते पुढच्या काही दिवसांत आपल्याला समजेल. परंतु, या १९ आमदारांपैकी कोणाला आमच्या पक्षात घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हा निर्णय आमचे पक्षप्रमुख घेतील. जे लोक स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष सोडून गेले त्या लोकांना, तसेच ज्यांना भाजपाने मारून-मुटकून, अडचणीत आणून तिकडे नेलं असेल त्यांना दुसरं प्राधान्य द्यावं. असं आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाटतं, असंही रोहित पवार म्हणाले.