pawar meet adani | शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर रोहित पवार थेटच म्हणाले…
VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी भेट, पवार-अदानी भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांचं भाष्य, काय दिली प्रतिक्रिया?
ठाणे, २३ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी झालेल्या चर्चेवर राजकीय वर्तुळात एकच चर्चा होत आहे. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या आजच्या भेटीवर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार आणि अदानी यांच्या भेट झाली असेल. शरद पवार हे गौतम आदानी, अंबानी या सगळ्यांना भेटतात. या सर्वांना भेटल्यानंतरच आपल्याला आपल्या राज्याचा विकास कसा करता येईल, याचा विचार करता येतो, असे रोहित पवार यांनी म्हटले तर राज्याच्या विकासाबाबतीत कुठे ना कुठेतरी चर्चा होत असते. त्यानंतर त्याच्यावर आपण पॉलिसी करत असतो सर्व घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी कधी करता येत नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट म्हटले आहे.
Published on: Sep 23, 2023 06:23 PM
Latest Videos