रोहित पवार अयोध्येत; फेसबुक पोस्टनंतर रंगू लागली चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते सहकुटुंब रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. ते सहकुटुंब रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, रोहित पवारांच्या अचानक अयोध्या दौऱ्याची (Ayodhya) राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादीलाही आता हिंदुत्वाचे वेध लागले की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर त्यांनी एक फेसबुक पोस्टही केली आहे. रोहित पवार सध्या चार दिवसांसाठी तीर्थयात्रेवर आहेत. रोहित पवार सहकुटुंब उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशातील सारनाथला (Sarnath) त्यांनी काल भेट दिली. ज्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचे वास्तव्य होते, त्या सारनाथमध्ये काल रोहित पवार होते.
Published on: May 07, 2022 01:58 PM
Latest Videos