‘शिरूरसंदर्भात कोणीही पोस्टर लावले तरी निर्णय शरद पवारच घेणार’; राष्ट्रवादी नेत्याचा कोणावर रोख
अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांना कामाला लागा अशा सुचना करत त्यांनाच तिकिट दिलं जाईल असे संकेत दिले आहेत. त्यांवरून आता पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सी खेच पाहायला मिळत आहे. अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांना कामाला लागा अशा सुचना करत त्यांनाच तिकिट दिलं जाईल असे संकेत दिले आहेत. त्यांवरून आता पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पत्रकार यांनाच तुम्ही पवार यांची क्षमता कमी आहे का असं म्हणायचंय का असा सवाल केला. तर त्यांनी येथे एका दगडात दोन पक्ष मारले की किती हे महत्वाचं नाही. तर इच्छुक म्हणून कोणी नेता आपले पोस्टर्स लावत नाही कार्तकर्ते लावतात. पण यथे शरद पवार जो निर्णय घेतील तो अंतिम असेल त्याला अजित पवार ही होकार देतील असंही ते म्हणाले. तर आधी माजी आमदार विलास लांडे यांनी अमेल कोल्हे यांना पाठिंबा देत तेच लोकसभेसाठी उभारणार अशी घोषणा केली होती. मात्र काल त्यांनी पुन्हा एकदा आपली इच्छा बोलून दाखवली आहे. त्यामुळे यावरून येथे पक्षातच अलबेल असल्याचे दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.