राज्यातील मोठा जिल्हा अहमदनगर, पण...; जिल्हा विभाजनाच्या निर्णयावर रोहित पवार म्हणताय...

राज्यातील मोठा जिल्हा अहमदनगर, पण…; जिल्हा विभाजनाच्या निर्णयावर रोहित पवार म्हणताय…

| Updated on: Jun 02, 2023 | 7:27 AM

VIDEO | अहमदनगर जिल्ह्याच्या नामकरणावर रोहित पवार यांचं भाष्य, काय म्हणाले?

अहमदनगर : अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याचे नामाकरण केले जात असल्याची घोषणा करण्यात आली. शिवसेना आणि भाजपच्या सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करण्यात आल्यानंतर विरोधकांनीही त्याचे स्वागत केले. मात्र आता ज्या प्रमाणे या जिल्ह्याचे नावामध्ये बदल केला आहे, त्याच प्रमाणे त्या नावातील बदलाबाबतही लवकरात लवकर अध्यादेश काढून तो अंमलात आणावा अशी मागणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवीने कुठलाही भेदभाव न करता सामान्य माणसांसाठी काम केलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या व्यक्तीचे जर नाव या जिल्ह्याला मिळत असेल तर त्याचे सर्वांनी स्वागतच केले पाहिजे असंही रोहित पवार यांनी सांगितले. निर्णय न घेता घोषणा केली आहे त्या गोष्टीचंही आम्ही स्वागत करतो. त्याच बरोबर त्यांनी जिल्हा विभाजनावर बोलताना सांगितले की, राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे, तर लोकांना विचारूनच जिल्हा विभाजनाचा निर्णय घेतला गेला पाहिजे असंही रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

Published on: Jun 02, 2023 07:27 AM