रोहित पवार म्हणताय, 'भाजपच्या 'या' नेत्यांवर बादलीभर गोमूत्र टाकायची गरज'

रोहित पवार म्हणताय, ‘भाजपच्या ‘या’ नेत्यांवर बादलीभर गोमूत्र टाकायची गरज’

| Updated on: Apr 04, 2023 | 8:56 PM

VIDEO | संभाजीनगरमधील वज्रमूठसभेनंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून सभास्थळी गोमूत्र शिंपडून ‘मैदान शुद्धीकरण’ करण्यात आलं त्यावर रोहित पवार म्हणाले...

अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर येथील सांस्कृतिक मैदानात झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेनंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्या सभास्थळी जाऊन गोमूत्र शिंपडून मैदान आणि मविआच्या नेत्यांनी ज्या व्यासपीठावरून भाषण केले त्या व्यासपीठाचं शुद्धीकरण केल्याचे पाहायला मिळाले. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ज्या नेत्यांनी महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचा अपमान केला त्या भाजपच्या नेत्यांवर या कार्यकर्त्यांनी बादलीभर गोमूत्र टाकायला हवं’, अशी खोचक प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. तर पुढे ते असेही म्हणाले की, महाविकास आघाडीच्या या सभेतून शेतकरी, कष्टकरी, युवा, महिला अशा सर्व घटकांचे विषय मांडण्यात आले, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुकोबाराया, साईबाबा यांच्या बद्दल ज्या लोकांनी खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केली त्यांच्याविरोधात या सभेमध्ये बोललं गेलं. यानंतर भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी सभास्थळी जाऊन गोमूत्र शिंपडलं. खरं तर मला आश्चर्या गोष्टीचे वाटते की हेच ते कार्यकर्ते आहेत, ज्यांनी काल सभास्थळी गोमूत्र शिंपडलं पण जेव्हा त्यांचे नेते कार्यकर्ते अशा थोरांचा अपमान करतात विरोधात बोलतात तेव्हा ते शांत का बसले होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Published on: Apr 04, 2023 08:56 PM