राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वादावर रोहित पवार म्हणाले…
VIDEO | राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील अंतर्गत वादावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया, काय म्हणाले बघा...
अहमदनगर : अहमदनगरमधील जामखेड येथे बाजार समितीची निवडणूक नुकतीच झाली. यामध्ये भाजपचा सभापती निवडून आला. यानंतर भाजप आमदार राम शिंदे यांनी सुजय विखे यांचा रोहित पवार आणि राष्ट्रवादीला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप केला. मात्र या आरोपांवर खासदार सुजय विखे पाटील यांनी भाष्य करत हा आरोप फेटाळून लावल्याचे पाहायला मिळालं होतं. दरम्यान, भाजप आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील वादावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, ते दोघे भाजप पक्षाचे नेते आहेत तो भाजपचा अंतर्गत विषय आहे. बाजार समितीची निवडणूक झाली त्यात मला भाजपकडून कोणीही मदत केली नाही. याऊलट जामखेडमध्ये जे राजकारण करण्यात आलं, यावर योग्य वेळ येईल तेव्हा वक्तव्य करेल. दबाव तंत्राचा मोठा वापर झाला. जे वाद विखे आणि शिंदे यांच्यात सुरू आहेत. त्यांनी एकत्र बसून त्यांनी त्यांच्यात संवाद साधून जो काही मतभेद असेल तो त्यांनी सोडवावा. यावेळी त्यांनी त्यांच्यातील कोण मोठा नेता आहे त्यांनी त्यांच्यातच ठरवावं, असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.