लोकांच्या हिताची नक्कीच कामं करेन : Rohit Pawar

| Updated on: Jan 22, 2022 | 6:56 PM

सर्व ताकद लावून सुध्दा वैरागकरांनी राष्ट्रवादीला कौल दिला त्याबद्दल सर्व नगरसेवकांच्यावतीने मतदारांचा आभार मानतो, अशी भावनिक साद आमदार रोहीत पवारांनी वैरागकरांना घातलीय.

बार्शी : बार्शी तालुक्यातील वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकहाती सत्ता आणल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी वैराग नगरपंचायतीला भेट देत जाहीर सभेला संबोधित केले. वैराग नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या विचाराची सत्ता आणत असताना आजी आमदार आणि माजी आमदार, मंत्री असलेल्या दिग्गजांनी काय प्रचार केला असेल याचा अंदाज मला आहे. तसेच कशा-कशाची ताकत त्यांनी लावली असेल याचाही अंदाज मला आहे. ही सर्व ताकद लावून सुध्दा वैरागकरांनी राष्ट्रवादीला कौल दिला त्याबद्दल सर्व नगरसेवकांच्यावतीने मतदारांचा आभार मानतो, अशी भावनिक साद आमदार रोहीत पवारांनी वैरागकरांना घातलीय.