‘ज्यांनी विचारही सोडले, त्यांना पवारांवर बोलण्याचा अधिकार काय?’, रोहित पवार यांचा थेट वळसे पाटील यांनाच सवाल
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर अजित पवार गटाचे नेते तथा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी थेट आरोप करत टीका केली. तर शरद पवार यांच्या राजकीय जीवनावरच सवाल उठलेत. त्यावरून आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. शरद पवार यांच्यावर बोलल्यावरून जिंतेद्र आव्हाड यांनी ट्विट करत त्यांचा समाचार घेतला.
पुणे : 21 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सध्या अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. तर त्यांच्या सभांनंतर प्रत्युत्तर सभा घेतल्या जात आहेत. आता बीड येथील सभेनंतर अजित पवार गटाकडून उत्तर दिलं जाणार आहे. मात्र याचदरम्यान अजित पवार गटाचे नेते तथा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर बोट ठेवत टीका केली. त्यांनी पवार हे देशामध्ये राजकीय क्षेत्रात मोठे आहेत. त्यांचा उंचीचा नेता येथे नाही. पण महाराष्ट्रात त्यांना कधीही एक हाथी सत्ता किंवा स्वत: च्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही असं म्हटलं. त्यावरून आता शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत यावरून जोरदार निशाना साधत टीका केली. तर याचमुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी वळसे पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी, वळसे पाटील हे पवार साहेबांच्या अतिशय जवळचे होते. त्यांनी अशी टीका केल्याचे आश्चर्य वाटते. पण त्यांच्यावर टीका करताना लोक तुम्हाला ही विचारणार, तुम्ही का नाही जबाबदारी पार पाडली. त्यावेळी तुम्ही काय म्हणाल? तर ज्या लोकांना पवार यांनी उभं केलं. तेच आता टीका करतायत. ज्यांनी त्यांचे विचार सोडले, त्यांना पवारांवर बोलण्याचा अधिकार काय? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.