टिंगरे यांच्या निष्क्रियतेचा भोपळा फुटला; जगदीश मुळीक यांची टिंगरेंवर टीका
वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे हे पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज उपोषण बसले आहेत. त्यांची ही कृती म्हणजे निष्क्रियतेचा भोपळा फुटल्याचे प्रतिक असल्याचे मुळीक यांनी म्हटलं आहे
पुणे : मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नांसंदर्भात बैठका, पत्रव्यवहार करूनही कामे न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे हे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणावर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी जोरदार टीका केली आहे. टिंगरेचे हे उपोषण म्हणजे एक नौटंकी असून त्यांचं हे अपयश आहे. सुनील टिंगरे यांना साडे तीन वर्षे एकही मोठं विकास काम करता आलं नाही. त्यामुळे टिंगरे यांची निष्क्रिय आमदार म्हणून ओळख झाल्याची टीका मुळीक यांनी केली आहे.
वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे हे पुणे महापालिका प्रशासनाच्या विरोधात आज उपोषण बसले आहेत. त्यांची ही कृती म्हणजे निष्क्रियतेचा भोपळा फुटल्याचे प्रतिक असल्याचे मुळीक यांनी म्हटलं आहे. तर टिंगरे यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता मतदारांसमोर आल्यानेत त्यांनी उपोषणाची स्टंटबाजी केली आहे अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली आहे.