भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कुठं आले एकत्र, काय आहे भेटीमागचं कारण?

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते कुठं आले एकत्र, काय आहे भेटीमागचं कारण?

| Updated on: Apr 25, 2023 | 10:12 AM

VIDEO | खासदार अमोल कोल्हे हे मंत्री शंभूराज देसाई यांना साताऱ्यात भेटले, काय आहे दोघांच्या भेटीचं कारण?

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली आहे. शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं निमंत्रण देण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी शंभूराजे यांची ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. यानिमित्ताने साताऱ्यात शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कराडमध्ये होणाऱ्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या महानाट्याचे निमंत्रण या सर्वांना खासदार अमोल कोल्हे यांच्या वतीने देण्यात आले. शिवसेनेचे मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, आमदार अनिल बाबर, भाजपचे आमदार जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार दिपक चव्हाण यांच्यात यावेळी बऱ्याच गप्पा रंगल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळातील काही जणांच्या भुवया देखील उंचावल्याने चर्चांना काहिसं उधाण देखील आले होते.

Published on: Apr 25, 2023 10:12 AM