नाहीतर राजकारणात असलेल्यांना 'आय'ची आय आठवेल! अमोल कोल्हे असं का म्हणाले? बघा व्हिडीओ

नाहीतर राजकारणात असलेल्यांना ‘आय’ची आय आठवेल! अमोल कोल्हे असं का म्हणाले? बघा व्हिडीओ

| Updated on: Apr 23, 2023 | 7:22 AM

VIDEO | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ईदच्या दिल्या हटके शुभेच्छा! 'ती' मिश्किल पोस्ट चर्चेत, बघा व्हिडीओ

मुंबई : रमजानचा पवित्र महिना संपला असून काल देशभरात रमजान ईद साजरी करण्यात आली. या ईदच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते मंडळींनी देखील शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. मात्र यात सगळ्यात हटके शुभेच्छा दिल्या त्या म्हणजे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी…सोशल मीडियावर अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला. त्यात असं लिहिलं की, ईदच्या शुभेच्छा देताना एकाने ED मुबारक असं लिहिलं होतं. त्यावर ते म्हणाले, ‘I’ लई Important… नाहीतर राजकारणात असलेल्यांना आयची आय आठवेल! E’i’d Mubarak! अमोल कोल्हे यांच्या या मिश्किल पोस्टची राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. इतकेच नाहीतर अमोल कोल्हे यांच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छा देत आपली मतं ही मांडल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Apr 23, 2023 07:22 AM