अजितदादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा, वाल्मिक कराड प्रकरणात काय-काय घडतंय?
वाल्मिक कराडच्या प्रकरणावरून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता का असा सवाल केला.
वाल्मिक कराडनं ज्या गाडीतून सरेंडर केलं त्या गाडीचा मालक अजित पवार मस्साजोगला आले त्यावेळी हजर होता, असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय. तसंच दादांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता का असा सवाल देखील सोनवणे यांनी केलाय. वाल्मिक कराड सरेंडर करण्याआधी जी गाडी वापरली त्या गाडीचा मालक अजित पवार मस्साजोगमध्ये आले तेव्हा हजर होता असा दावा सोनवणे यांनी केला. सीआयडीच्या नऊ नऊ पथकांच्या हाती न लागता २२ दिवसानंतर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीच्या ऑफिसमध्ये स्वतःहून आला आणि सरेंडर केलं. यावेळी ज्या गाडीने वाल्मिक कराड आला एमएस २३ बीजी २२३१ हीच ती गाडी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्ता शिवलिंग मोराळे यांची असून त्यांची पत्नी अनिता मोराळे यांच्या नावावर आहे. आता बजरंग सोनवणे जे म्हणतायेत की गाडीचा मालक अजित पवारांच्या दौऱ्यावेळी मसाजोगमध्ये हजर होता. त्यांचा रोख शिवलिंग मोराळे कडेच आहे पुरावा म्हणून पत्रकार परिषदेत त्यांनी फोटोही दाखवला.तर ज्या बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी चौकशी सुरू असून तिथे बाहेरचे लोक येऊन वाल्मिक कराडला भेटतात अशी तक्रार संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली. केजमधल्या कोरेगावचे माझी सरपंच बालाजी तांदळे यांचं नाव घेऊन धनंजय देशमुख यांनी चौकशीची मागणी बीडचे एसपी नवनीत कावत यांकडे केली. मात्र आपण वाल्मिक कराडला भेटायला गेले नव्हतो तर सीआयडीने बोलावल्याच तांदळे म्हणाले.