Special Report | अमोल कोल्हे यांच्या मनात ‘कमळ’? ‘भाजप’शी जवळीक वाढली? स्पष्टच म्हणाले…
VIDEO | 'त्या' व्हायरल व्हिडीओवर राष्ट्रवादीचे शिरूर येथील खासदार अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले, बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : आधी आभाळं बघायचं, वारं बघायचं अन् मग नांगरायला घ्यायचं… असं सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केलं होतं. त्यामुळे अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत अस्वस्थ असून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तर या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांची भाजपशी जवळीक वाढली आहे का? अशा चर्चा होत होत्या. या प्रश्नावर अमोल कोल्हे यांनी दिलेलं उत्तर चांगलंच व्हायरल होतंय. मात्र त्या व्हिडीओनंतर अमोल कोल्हे यांनी कोणत्याही शक्यतांना नकार दिल्याचे समोर आले आहे. यावेळी अमोल कोल्हे यांनी स्पष्ट म्हटलं की, मुद्दाम मी राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. पण गेल्या वर्षभरापासून घडत असलेल्या घडामोडींमुळे अमोल कोल्हे खरच नाराज आहेत का? अशा बातम्यांना बळ मिळतंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट