नागपुरात गुन्हेगारी वाढली? सुप्रिया सुळे आणि चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी, बघा काय केले आरोप-प्रत्यारोप?

नागपुरात गुन्हेगारी वाढली? सुप्रिया सुळे आणि चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी, बघा काय केले आरोप-प्रत्यारोप?

| Updated on: Oct 13, 2023 | 12:46 PM

tv9 Special Report | गेल्या काही महिन्यात नागपुरात गुन्हेगारी वाढल्याचं आकडेवारीच सांगत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय, बघा काय झाले आरोप-प्रत्यारोप

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | नागपुरात गुन्हेगारी वाढल्याच्या दाव्यावरुन सुप्रिया सुळे आणि भाजपच्या चित्रा वाघ यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. जेव्हा-जेव्हा फडणवीस गृहमंत्री होतात, तेव्हा-तेव्हा नागपुरात गुन्हेगारी वाढते या विधानावरुन राजकीय वर्तुळात सध्या हे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. गेल्या काही महिन्यात नागपुरात गुन्हेगारी वाढल्याचं आकडेवारीच सांगत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. त्यावरुन भाजपच्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं. जानेवारी 2023 ते 5 ऑगस्ट 2023 पर्यंतची ही आकडेवारी दरम्यानच्या या काळात हत्या झाल्या 57 विविध वर्तमानपत्रांमधून नागपूरच्या गुन्हेगारीबाबत ज्या बातम्या छापून आल्या आहेत. त्यानुसार नागपुरात गुन्हेगारी वाढली आहे. हत्याकांडाच्या बाबतीत मुंबईनंतर नागपूर दुसऱ्या स्थानी आहे, तर पुणे आणि ठाणे चौथ्या स्थानावर असल्याचे समोर आले आहे. सायबरच्या घटना आणि बालगुन्हेगारीच्या घटनांमध्येही नागपुरात वाढ झाल्याचा आरोप आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 13, 2023 12:46 PM