Supriya Sule धावल्या चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, शिंदे-फडणवीस सरकारकडे काय केली मागणी?

Supriya Sule धावल्या चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, शिंदे-फडणवीस सरकारकडे काय केली मागणी?

| Updated on: Aug 29, 2023 | 7:49 PM

VIDEO | चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे मोठी मागणी, नेमकी काय केली मागणी?

मुंबई, २९ ऑगस्ट २०२३ | बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेत. तर चिंताग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे मागणी केली. “केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. केंद्र सरकारच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्याचं कंबरडं सरकार मोडत आहे. जे केंद्रात होतं तेच दुर्देवाने महाराष्ट्रात होत आहे, ही अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. हे जुमल्याचं सरकार आहे.” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गेल्या आठ दिवसांपूर्वी एक पत्र पाठवलेले आहे. यामध्ये तातडीने राज्यात दुष्काळ जाहीर केला पाहिजे. जनावरांसाठी पुरेसा चारा नाही. शेतीसाठी पाणी नाही. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करा आणि दुष्काळ जाहीर करा, अशी मोठी मागणी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासह त्या असेही म्हणाल्या की, या सरकारने शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करु, असं आश्वासन दिलं. पण दुप्पट सोडा, जे आहे ते देखील दिलं जात नाही. याउलट शेतकऱ्यांचं खच्चीकरण केले जात आहे.

Published on: Aug 29, 2023 07:49 PM