Supriya Sule Video : ‘…एकतर तो पुरूष नाहीच’, नाव न घेता सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडेंवर जिव्हारी लागणारी टीका
‘राज्यातील एक मंत्री खूप बोलतो. हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. चार ते सहा महिन्यात या मंत्र्यांची विकेट पडणार’, असं मोठं वक्तव्य शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एक मोठं आणि खळबळजनक वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी या पक्षाचे दोन गट झाल्यावरून मोठं विधान करताना धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता जिव्हारी लागणारी टीका केली. शरद पवार यांच्या नेतृत्वाताली राष्ट्रवादीची नुकतीच एक आढावा बैठक झाली. या बैठकीची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे असं म्हणताय की, मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. मी त्या पक्षात काम करू शकत नाही. . सगळया दुनियेला माहीत आहे. माझी लढाई त्यांच्याबरोबर ते पक्षात असतानाही होती, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता जोरदार निशाणा साधला. पुढे त्या असंही म्हणाल्या, ‘जो पुरुष स्वत:ची जी बायको, जी आपल्या मुलांची आई आहे, तिच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो अशा पुरुषाबरोबर… एक तर तो पुरुष नाहीच आणि त्याच्याबरोबर मी काम करू शकणार नाही. तेव्हापासून लढाई सुरू झाली. मी आज पहिल्यांदाच ही गोष्ट बोलले. मी नाही कुणाला घाबरणार. मी असली फालतू लढाई करत नाही. मी विरोधी पक्षात आयुष्य घालवेल, पण नैतिकता सोडणार नाही, असं स्पष्टपणे वक्तव्य करत सुप्रिया सुळेंनी धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.