Supriya Sule Video : ‘एका डरपोक मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो अन्…’, बीड प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बीड प्रकरणावरून एक मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळत आहे. चार ते सहा महिन्यात या मंत्र्यांची विकेट पडेल असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आणि चर्चांना उधाण आलंय.
‘राज्यातील एक मंत्री खूप बोलतो. हा मंत्री बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो. चार ते सहा महिन्यात या मंत्र्यांची विकेट पडणार’, असं मोठं वक्तव्य शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. पुण्यात झालेल्या पक्षाच्या एका बैठकीत सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी मोठा गोप्यस्फोट केला. दरम्यान, पुण्यातील पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचा रोख नेमका कोणत्या मंत्र्यांकडे आहे, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसतेय. ‘१०० दिवसांत एक बळी गेला सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार.. नाव आताच जाहीर करणं योग्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. इतकंच नाहीतर जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, त्याचा बळी जाणार, असं सूचक वक्तव्य देखील सुप्रिया सुळे यांनी केलं. तर ‘राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहेत. हे डरपोक मंत्री कोण हे संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच कळणार आहे. चार ते सहा महिन्यात या मंत्र्यांची विकेट पडेल. बरं झालं पक्ष फुटला. २ मुलं असलेल्या बायकोच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो. अशा फालतू माणसाबरोबर काम करणं शक्य नाही’, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. बघा सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?