खासदार सुप्रिया सुळे यांचं लव्ह जिहादवर भाष्य, म्हणाल्या…
लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार... काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लव्ह जिहादवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तर लव्ह जिहादचा अर्थ असेल तर मी कुणाशीही चर्चा करायला तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लव्ह जिहाद हा खूप गंभीर विषय असून गेल्या काही दिवसांपासून मी फार मनमोकळेपणाने बोलत आहे. राज्यात मोर्चे काढण्याची एक नवी पद्धत निघाली आहे. हे मोर्चे तुम्हाला फक्त हे सांगतात की, काय खायचं, लग्न कुणाशी करायचं, एखाद्या धर्माबद्दलची माहिती त्यातून पोहोचली जाते, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत लव्ह जिहाद रोखण्यासाठी कायदा करावा आणि धर्मांतर विरोधी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी हिंदू समाजाने हिंदू जन आक्रोश मोर्च्यातून करण्यात आली होती. सुप्रिया सुळे यांनी मात्र, या मोर्चाची खिल्ली उडवत लव्ह जिहादचा अर्थ मला माहीत नाही. लव्हचा अर्थ मला कळतो. जिहादचा अर्थ मला कळत नाही, असे म्हटले होते.