राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धूसफूस? पक्षात पडली फूट? सुप्रिया सुळे यांनी काय केला पुनरुच्चार?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धूसफूस? पक्षात पडली फूट? सुप्रिया सुळे यांनी काय केला पुनरुच्चार?

| Updated on: Aug 25, 2023 | 5:27 PM

VIDEO | राष्ट्रवादीतील फुटीनंतर कार्यकर्ते संभ्रमात, राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे देशाचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील तर अजित पवार..., राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

पुणे, २५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळी अजित पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होते. यावेळी शरद पवार म्हणाले, ‘अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही.’ मात्र अवघ्या ५ तासात शरद पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत यु-टर्न घेतला आहे. मात्र राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशपातळीवरील नेते शरद पवार आहेत आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. तर अजितदादा महाराष्ट्राचे एक जेष्ठ नेते आहेत. तसेच अजितदादा गटाच्या 9 आमदार आणि 2 खासदारांनी पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या विरोधात एक पत्र महाराष्ट्र आणि दिल्लीच्या स्पीकरला पाठवलं आहे’, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर कार्यकर्ते संभ्रमात आहे. त्यावर त्यांना विचारलं असता, संभ्रम फक्त टीव्हीवर असतो. संभ्रम फक्त मीडियावाले लावतात. आमच्या कुणाच्या मनात संभ्रम नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Published on: Aug 25, 2023 05:27 PM