Ajit Pawar यांचं जनतेला पत्र; महायुतीत सहभागी होऊन 100 दिवस, तर सुप्रिया सुळे यांनी काय दिलं खरमरीत प्रत्युत्तर?
tv9 marathi Special report | एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप यांच्या महायुतीत सहभागी होऊन १०० दिवस पूर्ण झाल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला पत्र लिहिलं, हे पत्र येताच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही दिलंय खरमरीत प्रत्युत्तर
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | भाजप आणि शिंदेंच्या सरकारमध्ये सहभागी होऊन अजित पवार गटाला 100 दिवस झाल्यानंतर अजित पवारांनी पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र दादांचं पत्र येताच, सुप्रिया ताईंनीही प्रत्युत्तर दिलंय. सत्तेत सहभागी होऊन, अजित पवारांना 100 दिवस पूर्ण झालेत. त्याच निमित्तानं दादांनी एक पत्र लिहिलं आणि आपली भूमिका स्पष्ट केली. ‘वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं ‘बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व’ हे सूत्र माझी प्रेरणा आहे, हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे’, असे अजित दादांनी म्हटलंय. मात्र त्या पत्रात, दादांनी यशवंतराव चव्हाणांचा उल्लेख केला..त्यावरच सुप्रिया ताईंनी बोट ठेवत दादांना प्रत्युत्तर दिलंय. स्वत:चा उल्लेख राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष करताना अजित पवार यांनी केलेल्या भाष्यानंतर ‘दादांनी, यशवंतराव चव्हाणांच्या समाजकारणाचं सूत्र आपण अंगीकारलं असल्याचं सांगितलं’, असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले. पण सुप्रिया ताईंनीही ट्विटमधून, यशवंतराव चव्हाणांच्या पुस्तकाचा दाखला देत ते RSS अर्थात संघापासून कसे दूर राहिले हेही सांगितलं. म्हणजेच जे यशवंतराव चव्हाण संघापासून 4 हात दूर राहिलेत त्याच संघाशी संबंधित भाजपसोबत तुम्ही गेलात, हे ताईंनी दादांना सांगितलंय.